गोष्ट मला सांग आई
राजाराणीची नको, काऊमाऊची नको
गोष्ट मला सांग आई रामाची
वेळ माझी झाली आता झोपेची !
राम हसायचा कसा? राम रडायचा कसा?
आकाशीचा चांदोमामा मागायचा कसा?
समजूत कोणी घातली त्या वेड्याची?
राम काळा का गोरा? दिसत होता का बरा?
मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा?
आवड होती का ग त्याला खेळाची?
राम गेला का वनी? त्याला धाडीला कुणी?
भीती नाही त्याच्या कशी आली ग मनी?
सोबत तिथे त्याला होती का कोणाची?
गोष्ट मला सांग आई रामाची
वेळ माझी झाली आता झोपेची !
राम हसायचा कसा? राम रडायचा कसा?
आकाशीचा चांदोमामा मागायचा कसा?
समजूत कोणी घातली त्या वेड्याची?
राम काळा का गोरा? दिसत होता का बरा?
मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा?
आवड होती का ग त्याला खेळाची?
राम गेला का वनी? त्याला धाडीला कुणी?
भीती नाही त्याच्या कशी आली ग मनी?
सोबत तिथे त्याला होती का कोणाची?
गीत | - | उमाकांत काणेकर |
संगीत | - | दत्तराज खोत |
स्वर | - | शर्मिला दातार |
गीत प्रकार | - | बालगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.