गोपाला गोपाला देवकीनंदन
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला
ही धोंड्याला म्हणती देवता
भगत धुंडती तया जोगता
स्वत:च देती त्यास योग्यता
देव म्हणुनी कुणी न भजावे फुका शेंदरी दगडाला !
कुणी न रहावे खुळे अडाणी
शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी
यासाठी ही झिजते वाणी
मी जातीचा धोबी देवा, धुवीन कपडा मळलेला !
हेच मागणे तुला श्रीहरी
घाम गाळी त्या मिळो भाकरी
कुठेच कोणी नको भिकारी
कुणी कुणाचा नको रिणकरी, कुणी न विटो नर जन्माला !

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | मन्ना डे |
चित्रपट | - | देवकीनंदन गोपाला |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.