A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गोकुळाला वेड लाविले

या मुरलीने कौतुक केले
गोकुळाला वेड लाविले

वेड लाविले श्रीकृष्णाला
हिजविण क्षणही न सुचे त्याला
सतत आपुल्या अधरी धरिले

हिच्या मधुर मंजूळ सुरांतुन
अमरपुरीचे डुलले नंदन
यमुनेचे जळ चाल विसरले

अधरसुधा प्राशून हरीची
पावन झाली तनु मुरलीची
"भाग्यवती मी" मुरली बोले