A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गिरिधर वर वरिला

अर्ध्या रात्री यमुनापात्री कर त्याने धरिला
गिरिधर वर वरिला, माई मी
गिरिधर वर वरिला

रंगरंग नित मजसी खेळतो रंगनाथ माझा
मी मेवाडी राजदुलारी, मथुरेचा तो राजा
जगावेगळी लाभे सत्ता, ध्यास न दुसरा उरला
गिरिधर वर वरिला

फेर धरून मी नाच नाचले, न्याहळते श्यामा
मीच राधिका, मीच रुक्मिणी, मीच तयाची भामा
मुखी नाचते नाम तयाचे, ताल पैंजणी उरला
गिरिधर वर वरिला

कालिंदीच्या तटी कलयुगी रोज रंगते होरी
भिजे ओढणी भिजे कंचुकी, भिजती अंगे सारी
आनंदाचा पडतो पाऊस, मेघ सावळा झरला
गिरिधर वर वरिला