घेऊ कसा उखाणा
घेऊ कसा उखाणा, घेऊ कसा उखाणा?
का लाजले अशी मी, माझे मला कळेना
माझ्या मनोमनी मी कमलापरी फुलावे
या कमललोचनांनी कमलावरा पहावे
शुभनाम या प्रभुचे का ठाउके न कोणा
स्पर्शातल्या सुधेने हे अंग अंग न्हाले
या रम्य दर्शनाने डोळे कृतार्थ झाले
शब्दांत काय सांगू छेडून भाववीणा
मज रूप लक्षुमीचे, तू नाथ शेषशायी
माझी अनन्य प्रीती झाली विलीन पायी
माझ्यापुढे उभा तू साक्षात देवराणा
का लाजले अशी मी, माझे मला कळेना
माझ्या मनोमनी मी कमलापरी फुलावे
या कमललोचनांनी कमलावरा पहावे
शुभनाम या प्रभुचे का ठाउके न कोणा
स्पर्शातल्या सुधेने हे अंग अंग न्हाले
या रम्य दर्शनाने डोळे कृतार्थ झाले
शब्दांत काय सांगू छेडून भाववीणा
मज रूप लक्षुमीचे, तू नाथ शेषशायी
माझी अनन्य प्रीती झाली विलीन पायी
माझ्यापुढे उभा तू साक्षात देवराणा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | थांब लक्ष्मी कुंकू लाविते |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अनन्य | - | एकरूप / एकटा. |
कमला | - | लक्ष्मी. |
शेष | - | पृथ्वी डोक्यावर तोलून धरणारा सर्पांचा राजा. |
सुधा | - | अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.