घनदाट रानी वाहे
घनदाट रानी वाहे झुळुझुळु पाणी
पाखरे ही गोड गाती देवाजीची गाणी
वेळुच्या बनात चाले वार्याचे गायन
पाचोळ्याने भोवताली धरिले रिंगण
वाजवितो बासरी का इथे चक्रपाणि
दूरावर ऐकु येई सागराचे गीत
निळेनिळे डोंगर निश्चळ पुढे समाधीत
ध्यान लावुनी बैसले ऋषी-मुनीवाणी
वार्यामध्ये ऐकु येई तुझे कानगुज
चंद्रसूर्यतार्यांमाजी प्रभु तुझे तेज
राही सदा देवा माझ्या श्यामच्या जीवनी
पाखरे ही गोड गाती देवाजीची गाणी
वेळुच्या बनात चाले वार्याचे गायन
पाचोळ्याने भोवताली धरिले रिंगण
वाजवितो बासरी का इथे चक्रपाणि
दूरावर ऐकु येई सागराचे गीत
निळेनिळे डोंगर निश्चळ पुढे समाधीत
ध्यान लावुनी बैसले ऋषी-मुनीवाणी
वार्यामध्ये ऐकु येई तुझे कानगुज
चंद्रसूर्यतार्यांमाजी प्रभु तुझे तेज
राही सदा देवा माझ्या श्यामच्या जीवनी
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | श्यामची आई |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
चक्रपाणि(णी) | - | हातात सुदर्शनचक्र असलेला- विष्णू / विष्णूचा आठवा अवतार- कृष्ण. |
वेळू | - | बांबू. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.