A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घननीळा लडिवाळा

घननीळा लडिवाळा
झुलवु नको हिंदोळा !

सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्‍याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा !

सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कलिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा !