घन करुणेचा सूर
घन करुणेचा सूर, तयांतून भरु दे अवघा ऊर
शांत शांत हलकेच होऊ दे, जिवातले काहूर
अरूपाला मी साद घालता
गूढ निलायम मौन बोलता
नश्वर वितळून ईश्वर उजळो, साधनेस दे नूर
पाषाणातून झरू दे जीवन
असे वाहू दे स्वर संजीवन
ऐल पैल हे मुळी नसावे, असा जागू दे पूर
शांत शांत हलकेच होऊ दे, जिवातले काहूर
अरूपाला मी साद घालता
गूढ निलायम मौन बोलता
नश्वर वितळून ईश्वर उजळो, साधनेस दे नूर
पाषाणातून झरू दे जीवन
असे वाहू दे स्वर संजीवन
ऐल पैल हे मुळी नसावे, असा जागू दे पूर
गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | केदार पंडित |
स्वर | - | पं. संजीव अभ्यंकर |
अल्बम | - | जीवनरंग |
गीत प्रकार | - | भावगीत |
संजीवन | - | पुनुरुज्जीवन. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.