A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घन आज बरसे मनावर

सुख पावसापरी यावे, आयुष्य अन्‌ हे भिजावे
स्पर्शून आसवांना ह्या मातीत ओल्या रुजावे
जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो
घन आज बरसे मनावर हो
घन आज बरसे अनावर हो
चाहूल कुणाची त्यावर हो
घन आज बरसे अनावर हो

घेऊन गिरकी पानावरती थेंब उतरले
वार्‍याच्याही पायी वाजती पैंजण ओले
ही भूल सावळी पडे, झिरपले धुके, हिरव्या रानावर हो

अंगणातल्या मातीलाही सुचती गाणी
थेंब मोतीया खळखळ करती ओली नाणी
तो गंध भारतो पुन्हा मनास वेड्या, शिडकावा पानावर हो

मिटले आता मधले अंतर, पाऊस पडून गेल्यानंतर
घडून जाईल नाजुक ओले काही, मन होईल हळवे कातर
पाऊस येईल पुन्हा नीज मोडाया, मग येऊ भानावर हो

घन आज बरसे मनावर हो
घन आज बरसे अनावर हो
चाहूल सुखाची त्यावर हो
घन आज बरसे अनावर हो