घडणारे सारे घडून गेले
घडणारे सारे घडून गेले पुरते
मी अजून स्वप्नी खुळ्यापरी का रमते?
हळुवारपणाने जपली होती प्रीत
परि विपरीत तोही, विपरीत त्याची रीत
भ्रमराच्या नादे, फूल बिचारे फसते !
त्या शपथा हळव्या, हळवे प्रेम उखाणे
ते होते केवळ फसवे धूर्त बहाणे
ना गुन्हा तरीही, शापित जीवन जगते !
आसमंत सारा भासे शून्य भयाण
ना वृक्षावरती एकही हलते पान
का जुन्या स्मृतींना आठवुनी मी रडते?
मी अजून स्वप्नी खुळ्यापरी का रमते?
हळुवारपणाने जपली होती प्रीत
परि विपरीत तोही, विपरीत त्याची रीत
भ्रमराच्या नादे, फूल बिचारे फसते !
त्या शपथा हळव्या, हळवे प्रेम उखाणे
ते होते केवळ फसवे धूर्त बहाणे
ना गुन्हा तरीही, शापित जीवन जगते !
आसमंत सारा भासे शून्य भयाण
ना वृक्षावरती एकही हलते पान
का जुन्या स्मृतींना आठवुनी मी रडते?
गीत | - | म. पां. भावे |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | उषा मंगेशकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.