A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घबाड मिळू दे मला

घबाड मिळू दे मला रे खंडोबा, घबाड मिळू दे मला
अरं भंडारा वाहीन तुला रे खंडोबा घबाड मिळू दे मला

बारा कोसावर एक वाडी आहे, तिथं एक मारावाडी आहे
त्याचा मोठा वाडा आहे, अन्‌ त्यावर महा दरोडा आहे
पावू दे मणभर सोनं मला रं, भंडारा वाहीन तुला

मणभर सोनं ह्याले पाहिजे, कोणासाठी?.. स्वत:साठी
अन्‌ खंडोबाले देणार काय? हळद नुसती दोन चिमटी !
बाप्पा हा सौदा झाला !

लेकरू होऊ दे मले ग मरिमाई, लेकरू होऊ दे मले
बकरू कापीन तुले ग मरिमाई, लेकरू होऊ दे मले

मी अन्‌ माझ्या दोन सवती, कोन्या एकीलेही नाई संतती
त्यांच्या आधी कृपा कर माझ्यावरती
लोटांगण घालतो तुझ्या पायावरती
लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला

दगडाचा देव, घेत नाही देत नाही
पापाची साथ कुणी करत नाही
नवसानं पोर कोणाले होत नाही
माणूस खादाड, देव काही मांगत नाही
देव म्हनता का धोंड्याला?
धान म्हनता का कोंड्याला?

जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल