गीत हे गाशील तेव्हा
गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही
प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार नाही
कोवळ्या किरणांत जेव्हा केस तू सोडून येशिल
लाडके लाजून माझे फूल हे हसणार नाही
चांदणे बिलगेल अंगा कोवळे रेशीम होऊन
त्या क्षणी पाऊल माझे हे पुन्हा फसणार नाही
कालचे ना आज पाणी, अर्थ हे उरणार नाहित
पाहुनी चंद्राकडे मी आसवे पुसणार नाही

गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | अनिल-अरुण |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.