गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी !
सूर खोळंबले तुझ्यासाठी !
तू मला अर्थ दे अजून तरी
शब्द ओलांडले तुझ्यासाठी !
ही तुझी रात.. हे तुझे तारे..
श्वास घेती फुले तुझ्यासाठी !
दूर.. येथून दूर.. दूर.. तिथे-
चांदणे थांबले तुझ्यासाठी !
का तुला सोडवे न गाव तुझे?
मी मला सोडले तुझ्यासाठी !
सूर खोळंबले तुझ्यासाठी !
तू मला अर्थ दे अजून तरी
शब्द ओलांडले तुझ्यासाठी !
ही तुझी रात.. हे तुझे तारे..
श्वास घेती फुले तुझ्यासाठी !
दूर.. येथून दूर.. दूर.. तिथे-
चांदणे थांबले तुझ्यासाठी !
का तुला सोडवे न गाव तुझे?
मी मला सोडले तुझ्यासाठी !
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.