A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गळ्यात घालुनी गळा

गळ्यात घालुनी गळा गाउया प्रीतीची गाणी
तू राजा अन्‌ मी राणी !
मी राजा अन्‌ तू राणी !

चल बिलगुनी चालू अधांतरी, या डोंगर माथ्यावरती
हे निळेनिळे आभाळ येईल तुझ्या न्‌ माझ्या हाती
कसे उरावे भान मला तू मिठीत ग साजणी
तू राजा अन्‌ मी राणी !
मी राजा अन्‌ तू राणी !

सूर बिलगले तुझ्या सुरांना, राहू रे मी कशी एकटी
मी तुझ्या रूपातच रे एकरूप झाले शेवटी
तू माझा अनुराग तुझी मी अनुरागी रागिणी
मी राजा अन्‌ तू राणी !
तू राजा अन्‌ मी राणी !
अनुराग - प्रेम, निष्ठा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  आशा भोसले, महेंद्र कपूर