A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गगनी अर्धा चंद्र उगवला

गगनी अर्धा चंद्र उगवला, मोहरले चांदणे
अडली वाणी, मिटे पापणी, मिटली ग लोचने
राहिले अर्ध्यावर बोलणे !

प्रथम बोलले तेच काहीसे
मला न सुचले उत्तर कैसे
भलत्या वेळी कसे बाई ग आठवले लाजणे?

धीर धरून मी पुसता काही
अस्फुट त्यांचे उत्तर येई
शब्दाहुनही अधिक बोलके झाले मग पाहणे !

एक हाक ये दुरुनी साधी
सिद्धीपुर्वी सुटे समाधी
पुन्हा न जमले कधी त्यापरी एकान्‍ती भेटणे !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर-
चित्रपट - देवघर (१९५६)
गीत प्रकार - शब्दशारदेचे चांदणे, चित्रगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.