A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एक तत्त्व नाम दृढ धरीं

एक तत्त्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसि करुणा येईल तूझी ॥१॥

तें नाम सोपारें राम कृष्ण गोविंद ।
वाचेसीं सद्गद जपें आधीं ॥२॥

नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
वायां आणिका पंथा जासी झणें ॥३॥

ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं,
धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - केशवराव भोळे
स्वराविष्कार- यशवंत
प्रकाश घांग्रेकर
प्रसाद सावकार
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट - संत ज्ञानेश्वर
गीत प्रकार - चित्रगीत, संतवाणी
  
टीप -
• स्वर- यशवंत, संगीत- केशवराव भोळे, चित्रपट- संत ज्ञानेश्वर.
• स्वर- प्रकाश घांग्रेकर, संगीत- ???.
• स्वर- प्रसाद सावकार, संगीत- ???.
झणी - अविलंब.
परतें - वेगळे / श्रेष्ठ.
सद्गद - कंठ दाटून येऊन.
सोपारें - फार सोपे.
भावार्थ-

तत्त्वज्ञानाच्या चर्चा कर-करून अनेकांनी अनेक तत्त्वें शोधून काढली आहेत. पण नाम हे सर्वश्रेष्ठ आणि सर्व-सुलभ तत्त्व आहे. म्हणून अन्य मार्ग सोडून अंत:करणपूर्वक वाणीने नाम जपत रहावे. ज्ञानदेव तर निरंतर अंत:करणात मौनानेच हरि-नाम जपत असतो.

आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  यशवंत
  प्रकाश घांग्रेकर
  प्रसाद सावकार