एकत्र गुंफून जीवित-धागे
एकत्र गुंफून जीवित-धागे
प्रीतीचें नर्तन नाचलों मागें
एकटा उभा मी येथें
भोवतीं शोधीं प्रियेतें;
न दिसे का कोठें सोडून गेली?
लोपते का कधीं प्रीति उदेली !
दृष्टीस पडे हें भयाण मात्र
रेताड कोरडें उथळ पात्र !
जर न सखि संगतीं
तर मी कुंठीत गति.
प्रीति या हृदयीं अथांग खोल
तुडुंब भरली परंतु फोल.
हिणविती कोणी, "भावना मेली
हांसेना बोलेना करीना केली !"
खट्याळ तुफानी वारा
दौडत येतां भरारा
उठती चंचल बाह्य तरंग
अंतरीं जडता न पावे भंग.
खाऊन रवीचा प्रखर ताप
कष्टून, लागून जिवांस धाप
प्रदोषसमयीं येती
क्षणैक आराम घेती
घरास वळती माणसें गुरें
मदीय अंतर नि:शब्द झुरे.
म्हणत मंगल जंगलगान
कड्याहून खालीं लोटून प्राण
होऊन काषायरंग
प्रेमात बेहोष दंग
पावूं या समाधिसागरीं अंत !
अजून संपेना वैशाख हंत !
प्रीतीचें नर्तन नाचलों मागें
एकटा उभा मी येथें
भोवतीं शोधीं प्रियेतें;
न दिसे का कोठें सोडून गेली?
लोपते का कधीं प्रीति उदेली !
दृष्टीस पडे हें भयाण मात्र
रेताड कोरडें उथळ पात्र !
जर न सखि संगतीं
तर मी कुंठीत गति.
प्रीति या हृदयीं अथांग खोल
तुडुंब भरली परंतु फोल.
हिणविती कोणी, "भावना मेली
हांसेना बोलेना करीना केली !"
खट्याळ तुफानी वारा
दौडत येतां भरारा
उठती चंचल बाह्य तरंग
अंतरीं जडता न पावे भंग.
खाऊन रवीचा प्रखर ताप
कष्टून, लागून जिवांस धाप
प्रदोषसमयीं येती
क्षणैक आराम घेती
घरास वळती माणसें गुरें
मदीय अंतर नि:शब्द झुरे.
म्हणत मंगल जंगलगान
कड्याहून खालीं लोटून प्राण
होऊन काषायरंग
प्रेमात बेहोष दंग
पावूं या समाधिसागरीं अंत !
अजून संपेना वैशाख हंत !
गीत | - | माधव ज्युलियन |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | जी. एन्. जोशी |
गीत प्रकार | - | भावगीत |
काषाय | - | लाल / भगवा. |
प्रदोष | - | संध्याकाळ. |
मदीय | - | माझी. |
हंत | - | खेद / शोक. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.