A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एकलीच दीपकळी मी

एकलीच दीप-कळी मी अभागिनी
स्‍नेहाविण केवि जगू विजन-काननी?

माझिया न संगतीस या इथे कुणी
प्रेमास्तव तळमळते मी वियोगिनी !
देवा ! मी ओवाळू प्रीतिने कुणा?
कोणाला सांगावी मूक वेदना?
काहीही अर्थ नुरे रुक्ष जीवनीं !