A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एक फुलले फूल आणि

एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले, त्या कुणी ना पाहिले

मंद अगदी गंध त्याचा, मंद इवले डोलणे
साधले ना मुळी तयाला नटुनथटुनी नाचणे
कोवळे काळीज त्याचे, परि कुणीसे मोहिले

त्या 'कुणा'ला काय ठावी या फुलाची आवडी
तो न आला या दिशेला वाट करुनी वाकडी
या फुलाला मात्र दिसली दुरून त्याची पाऊले

एक दुसरे फूल त्याने खुडुन हाती घेतले
या फुलाचे जळून गेले भाव उभरे आतले
करपली वेडी अबोली दुःख देठी राहिले