A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एक लाजरा न्‌ साजरा

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला ग
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग
ह्या एकान्‍ताचा तुला इशारा कळला ग
लाज आडवी येती मला की जीव माझा भुलला ग
नको राणी नको लाजू, लाजमधी नको भिजू
इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू
का?
बघत्यात !

रेशीम विळखा घालून सजणा नका हो कवळून धरू
, लुकलुक डोळं करून भोळं बघतंय फुलपाखरू
कसा मिळावा पुन्हा साजणी मोका असला ग

डोळं रोखुन थोडं वाकून झुकू नका हो पुढं
पटघुम पटघुम करून कबूतर बघतंय माझ्याकडं
लई दिसानं सखे आज ह्यो धागा जुळला ग

बेजार झाले सोडा सजणा, शिरशिरी आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला ग?