एक एक विरते तारा
एक एक विरते तारा, आसमंत ये आकारा
उभा देवराया क्षितिजावरती
उठी श्रीधरा रे सरली राती
पालवीत किलबिल होई, दिगंतरा पक्षी जाई
दिशा सोनियाने अवघ्या न्हाती
उठी श्रीधरा रे सरली राती
किरण सोनियाचे माझ्या अंगणात आले
मंद मंद वाहे वारा, तुळस त्यात डोले
रंगवल्लिकेच्या रेखा, कुणी रेखिताती देखा
सुवासिनी जळभरणाते जाती
उठी श्रीधरा रे सरली राती
फुटे गाउलीला पान्हा, तिला तिचा बिलगे तान्हा
माय माउलीची ममता मोठी
उठी श्रीधरा रे सरली राती
उभा देवराया क्षितिजावरती
उठी श्रीधरा रे सरली राती
पालवीत किलबिल होई, दिगंतरा पक्षी जाई
दिशा सोनियाने अवघ्या न्हाती
उठी श्रीधरा रे सरली राती
किरण सोनियाचे माझ्या अंगणात आले
मंद मंद वाहे वारा, तुळस त्यात डोले
रंगवल्लिकेच्या रेखा, कुणी रेखिताती देखा
सुवासिनी जळभरणाते जाती
उठी श्रीधरा रे सरली राती
फुटे गाउलीला पान्हा, तिला तिचा बिलगे तान्हा
माय माउलीची ममता मोठी
उठी श्रीधरा रे सरली राती
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | आदिल अहमद |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | स्वप्न तेच लोचनी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
दिगंतर | - | सर्वदूर. |
वल्लरी | - | वेल (वल्ली, वल्लिका). |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.