A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
इच्छा देवाची

इच्छा देवाची देवाची
इच्छा देवाची.

तोच वाहतो सदैव चिंता
अनंत या विश्वाची
इच्छा देवाची.

दयासिंधु तुज म्हणती देवा
दु:खाचा का जग मग वणवा
का रे ताटातूट अशी ही
बहिणीची भावांची?
इच्छा देवाची.

प्राजक्ताची फुले उमलती
तशा भावना हृदयी फुलती
कोमलतेवर क्रूर पाऊले
नाचती दुर्दैवाची
इच्छा देवाची.

प्रेमासाठी माणुस जगतो
प्रेमासाठी झुरतो मरतो
जग ही वस्ती प्रेमासाठी
जळणार्‍या ज्योतींची
इच्छा देवाची.