A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दत्तदिगंबर दैवत माझे

दत्तदिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे

अनुसूयेचे सत्त्व आगळे
तिन्ही देवही झाली बाळे
त्रैमूर्ती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे

तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरि पायी खडावा, भस्मविलेपीत कांती साजे

पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती
सारे सात्त्विक भाव उमलती, हळुहळु सरते मीपण माझे