दूर जाते ही वाट
दूर जाते ही वाट
रात अंधारी दाट
अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी
आज जाईजुई साद देती मला
आज काळोख सारा कृष्ण झाला
धीर कैसा धरू
मन कसे आवरू
अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी
सांजवेळी कसा आज तू येउनी
राधिकेला अशी एकटी पाहुनी
हाय धरशी करा
लाज तुज ना जरा
अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी
राधिकेचा हरी प्राण हा जाहला
तेज ज्योतीस आले, प्रीतिचा सोहळा हा
कृष्ण माझा जरी
रात वैरी तरी
अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी
रात अंधारी दाट
अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी
आज जाईजुई साद देती मला
आज काळोख सारा कृष्ण झाला
धीर कैसा धरू
मन कसे आवरू
अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी
सांजवेळी कसा आज तू येउनी
राधिकेला अशी एकटी पाहुनी
हाय धरशी करा
लाज तुज ना जरा
अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी
राधिकेचा हरी प्राण हा जाहला
तेज ज्योतीस आले, प्रीतिचा सोहळा हा
कृष्ण माझा जरी
रात वैरी तरी
अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | वाणी जयराम |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.