दौलतीच्या राजा उठून सर्जा
दौलतीच्या राजा उठून सर्जा
हाक दे शेजार्याला रे शिवारी चला ॥
संदी लई नामी आलीया अवंदा
महागाईचा ह्यो विखारी कुंदा
माजलाय् चौकडं पाही बरं दादा
दाखवया बळा, एकीचा इळा
हाती धरू भक्कम अपुला रे शिवारी चला
आपसातल्या फुटीचा चिवट केणा
वरवर छाटलाय् तरी जाईना
अन् जराशी बी शेती पिकू देईना
उपटून मुळी घाल पायदळी
तुडवून आला गेला रे शिवारी चला
काळ्या बाजारातली माकडं काळी
तोंडातला घास निट काढून नेई
घ्या दिसा लुटत्यात रं आंबराई
एकजूट करून निट नेम धरून
आखरीचा माराया टोला रे शिवारी चला
रातदिस राबून सालंन् साल
किती पिढ्या आम्ही काढायचं हाल
काळावर चाल कर, हत्यार नीट धर
एकीचा बांधून किल्ला रे शिवारी चला
हाक दे शेजार्याला रे शिवारी चला ॥
संदी लई नामी आलीया अवंदा
महागाईचा ह्यो विखारी कुंदा
माजलाय् चौकडं पाही बरं दादा
दाखवया बळा, एकीचा इळा
हाती धरू भक्कम अपुला रे शिवारी चला
आपसातल्या फुटीचा चिवट केणा
वरवर छाटलाय् तरी जाईना
अन् जराशी बी शेती पिकू देईना
उपटून मुळी घाल पायदळी
तुडवून आला गेला रे शिवारी चला
काळ्या बाजारातली माकडं काळी
तोंडातला घास निट काढून नेई
घ्या दिसा लुटत्यात रं आंबराई
एकजूट करून निट नेम धरून
आखरीचा माराया टोला रे शिवारी चला
रातदिस राबून सालंन् साल
किती पिढ्या आम्ही काढायचं हाल
काळावर चाल कर, हत्यार नीट धर
एकीचा बांधून किल्ला रे शिवारी चला
गीत | - | शाहीर अण्णा भाऊ साठे |
संगीत | - | शाहीर अमर शेख |
स्वर | - | शाहीर अमरशेख |
गीत प्रकार | - | लोकगीत, स्फूर्ती गीत |
टीप - • लोकक्रांती गीत. |
केणा | - | हे एक जोमात वाढणारे गवत(तण) आहे. केणा हे तण पिकांसाठी अत्यंत घातक व पिकांची वाढ खुंटविणारे असते. |
कुंदा | - | ठेचा. |
शिवार | - | शेत. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.