A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
​दोन जिवांचें प्रेम बिचारें

​दोन जिवांचें प्रेम बिचारें विरघळलें संसारीं ।
जोवरि नव्हतें झालें मीलन तोंवरि त्याची गोडी ॥

संसाराच्या रणमैदानीं उतरलीं जेव्हां राजाराणी ।
प्रणयाचीं हीं नाजुक स्वप्‍नें कैसी उरतील सांग साजणी ॥

प्रेमधनाची झाली होळी ।
त्या होळीवर भाजूं पोळी ।
नांवहि मोठें, लक्षण खोटें, प्रेमाचें संसारी ॥

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मास्टर अविनाश, ज्योत्‍स्‍ना भोळे