A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
डोळे हे जुलमि गडे

डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहुं नका !
जादुगिरी त्यांत पुरी
येथ उभे राहुं नका.

घालुं कशी कशिदा मी?
होती किति सांगुं चुका !
बोचे सुइ फिरफिरुनी
वेळ सख्या, जाय फुका.

खळबळ किति होय मनीं !
हसतिल मज सर्वजणी;
येतिल त्या संधि बघुनि
आग उगा लावुं नका !
गीत - भा. रा. तांबे
संगीत - वसंत प्रभु
स्वराविष्कार- आशा भोसले
जी. एन्‌. जोशी
केशवराव भोळे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र मारुबिहाग
गीत प्रकार - भावगीत, नयनांच्या कोंदणी
  
टीप -
• काव्य रचना- १८९१, देवास.
• स्वर- आशा भोसले, संगीत- वसंत प्रभू.
• स्वर- जी. एन्‌. जोशी, संगीत- जी. एन्‌. जोशी.
• स्वर- केशवराव भोळे, संगीत- केशवराव भोळे.

कशिदा - वस्‍त्रावर केलेले वेलबुट्टीचे नक्षीकाम.
नोंद
'डोळे तुमचे जादुगिरी' अशी एक जुनी लावणी ऐकिवात आहे.
- 'समग्र तांबे' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  आशा भोसले
  जी. एन्‌. जोशी
  केशवराव भोळे