A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दो नयनांचे हितगुज झाले

दो नयनांचे हितगुज झाले
तुला समजले मला उमजले

क्षणभर गेले तेज लकाकुन
अंतरातला कण कण उजळून
गात्रागात्रांतुनी निथळले

स्वप्‍नांनी आकार घेतला
मौनांतुन हुंकार उमटला
शब्दांना माधुर्य गवसले

दोन मनांचे झाले मीलन
खुले जीवनी नवीन दालन
त्यात चांदणे धुंद पहुडले

अंतर्यामी येत कोरिता
मरणाला जे न ये चोरिता
काहीतरी जे जगावेगळे