प्रगटतां अवनितलिं कोण त्या लोपवी?
शौर्यसागर-लहरि गगन-मंडल महा
भेदितां कवण त्या अबल कर थोपवी?
गीत | - | वीर वामनराव जोशी |
संगीत | - | वझेबुवा |
स्वराविष्कार | - | ∙ पं. जितेंद्र अभिषेकी ∙ मास्टर दीनानाथ ∙ रामदास कामत ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | रणदुंदुभि |
राग | - | मालकंस |
ताल | - | झपताल |
चाल | - | कृष्णमुखचंद्र |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, स्फूर्ती गीत |
अवनि | - | पृथ्वी. |
कवण | - | कोण ? |
हें नाटक रंगभूमीवर आणण्याचेच काय पण लिहविण्याचेंही सर्व श्रेय 'बलवंत संगीत मंडळी'चे मालक मि. रा. रा. चिंतामणराव कोल्हटकर, संगीतरत्न मास्टर दिनानाथ व मि. रा. रा. कृष्णराव कोल्हापुरे यांच्याकडे आहे. याच्या प्रेमाग्रहाच्या अभावी हें नाटक जन्मास आले असतें किंवा नाहीं याची वानवाच आहे. तेव्हां त्यांचे मला प्रथम आभार मानिले पाहिजेत.
संगीत नाट्यरचनेस मधुर चालींची अत्यावश्यकता असल्यामुळे व या बाबतींत मला बिलकूल ज्ञान नसल्यामुळे गायनाचार्य रा. रा. रामकृष्णबुवा वझे यांचें जें मला निरपेक्ष साहाय्य झालें तें तर केवळ अमोलच आहे, व त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.
नाटक प्रयोगरूपानें रंगभूमीवर आणण्याच्या काम बलवंत संगीत मंडळीतील नटवर्गाने व इतर सहकारी मंडळीनें जी आस्था व जें प्रेम दाखविलें त्याबद्दल त्यांचे आभार मानणे जरूर आहे.
(संपादित)
वामन गोपाळ जोशी
दि. ११ फेब्रुवारी १९२७
'संगीत रणदुंदुभि' या नाटकाच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- जगन्नाथ रामचंद्र रानडे (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.