दिवे लागले रे दिवे
दिवे लागले रे दिवे लागले
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठींच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जागले
रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले
तिथे मोकळा मी मला हुंगिताना
उरी गंध कल्लोळुनी फाकले
उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन्
उषासूक्त ओठांत ओथंबले
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठींच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जागले
रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले
तिथे मोकळा मी मला हुंगिताना
उरी गंध कल्लोळुनी फाकले
उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन्
उषासूक्त ओठांत ओथंबले
गीत | - | शंकर रामाणी |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वराविष्कार | - | ∙ पं. जितेंद्र अभिषेकी ∙ पद्मजा फेणाणी-जोगळेकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी, संगीत- पं. जितेंद्र अभिषेकी. • स्वर- पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संगीत- पद्मजा फेणाणी-जोगळेकर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.