A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिसली पुनरपी गुप्त जाहली

दिसली पुनरपी गुप्त जाहली प्रिया सुभद्रा घोर वनीं ।
येथें सुंदरी कैशी आली हेंचि कळेना मज अजुनी ॥

माझ्या वेषा खरें मानुनी हलधरही लागत भजनीं ।
त्रिकालज्ञ परि मोह पावले कैसे नकळे गर्गमुनी ।
कपटी कृष्णाचीही बुद्धी गेली कैशी ती भुलुनी ।
या सर्वांचा विचार करितां जातों मूढचि होवोनी ॥