दीपका मांडिलें तुला
'दीपका' ! मांडिलें तुला सोनियाचें ताट
घडविला जडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरीं कांठोकांठ
दारीं आलेल्याची करूं सोपी पायवाट
घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी
घाशिली समई मीं ही केली तेलवात
दह्यांत हा कालविला जिरेसाळ भात
गा रे राघू, गा ग मैने, बाळाच्या या ओळी
मुखीं तुमच्याही घालूं दुधांतली पोळी
कुतू, काऊ, चिऊ, माऊ या रे सारे या रे
सांडलेलीं शितें गोड उचलुनी घ्या रे
गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करीं माये ! कुलदेवी !
घडविला जडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरीं कांठोकांठ
दारीं आलेल्याची करूं सोपी पायवाट
घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी
घाशिली समई मीं ही केली तेलवात
दह्यांत हा कालविला जिरेसाळ भात
गा रे राघू, गा ग मैने, बाळाच्या या ओळी
मुखीं तुमच्याही घालूं दुधांतली पोळी
कुतू, काऊ, चिऊ, माऊ या रे सारे या रे
सांडलेलीं शितें गोड उचलुनी घ्या रे
गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करीं माये ! कुलदेवी !
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | कमलाकर भागवत |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | बालगीत |
टीप - • काव्य रचना- २६ जुलै १९४४. |
जिरेसाळ | - | भाताचा प्रकार. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.