A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिलवर माझा नाही आला

दिलवर माझा नाही आला
चांद चवथीचा मावळला

किती समजावू विकल मनाला
मन समजावी फिरुनी मजला
आणि घालुनी गळ्यात गळा
अश्रुफुलांच्या गुंफित माळा

उभी लोचनी व्याकुळलेली
अधीरता ही शिणली थकली
वाट बघुनिया नीज निजली
पापणीच्या पायतळाला

नयनकवाडे उघडी अजुनी
कशी घेऊ मी बंद करुनी?
त्रिभुवन धुंडुन नजरा परतुनी
येतिल जर का घेऊन त्याला