A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिगंबरा दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
दत्तगुरूंचे नाम स्मरा हो, दत्तगुरूंचे भजन करा

हे नामामृत भवभयहारक
अघसंहारक, त्रिभुवनतारक
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया अमोल ठेवा हाती धरा

दत्तचरण माहेर सुखाचे
दत्तभजन भोजन मोक्षाचे
कवच लाभता दत्तकृपेचे, कळिकाळाचे भय न जरा

हा उत्पत्ति-स्थिति-लय कर्ता
योग, ज्ञान, उद्गाता, त्राता
दत्तचरित मधु गाता गाता, भवसागर हा पार करा