धुंद होते शब्द सारे
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वार्यासंगे वाहता, त्या फुलापाशी थांब ना
सइ ये, रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे?
धुंद होते शब्द सारे !
मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा !
धुंद होते शब्द सारे, धुंद होते भाव सारे
सइ ये, रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे?
धुंद होते शब्द सारे !
वार्यासंगे वाहता, त्या फुलापाशी थांब ना
सइ ये, रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे?
धुंद होते शब्द सारे !
मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा !
धुंद होते शब्द सारे, धुंद होते भाव सारे
सइ ये, रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे?
धुंद होते शब्द सारे !
गीत | - | कौस्तुभ सावरकर |
संगीत | - | अमार्त्य राहूत |
स्वराविष्कार | - | ∙ रवींद्र बिजूर ∙ बेला शेंडे ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | उत्तरायण |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.