धांव घालीं विठू आतां
धांव घालीं विठू आतां चालूं नको मंद ।
बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥
विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला ।
शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला ॥२॥
जोडुनियां कर चोखा विनवितो देवा ।
बोलिला उत्तरीं परि राग नसावा ॥३॥
बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥
विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला ।
शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला ॥२॥
जोडुनियां कर चोखा विनवितो देवा ।
बोलिला उत्तरीं परि राग नसावा ॥३॥
गीत | - | संत चोखामेळा |
संगीत | - | मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन |
स्वर | - | बालगंधर्व |
नाटक | - | संत कान्होपात्रा |
राग | - | पिलू |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, नाट्यसंगीत, संतवाणी |
बडवा | - | पंढरपूरच्या विठोबाचा ब्राह्मण पुजारी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.