A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धांव घाली माझें आई

धांव घाली माझें आई ।
आतां पाहतेसी काईं ॥१॥

धीर नाहीं माझे पोटीं ।
जालें वियोगें हिंपुटीं ॥२॥

करावें सीतळ ।
बहु जाली हळहळ ॥३॥

तुका ह्मणे डोईं ।
कधी ठेवीन हे पायीं ॥४॥