धौम्य ऋषी सांगतसे
धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा
रामासंगे जानकी नांदताना काननी
सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी
सीता म्हणे लाडकी, "मारा त्यासी राघवा
कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा"
राम गेले धावुनी ग बाणभाता घेउनी
सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी
साद आला दूरचा कोणी मला वाचवा
ओळखिला साद तो बावरली सुंदरा
रामा मागे धाडिले लक्ष्मणा देवरा
काय झाले काय की ग? चित्ती उठे कालवा
आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली
रावणाने पाऊले तोच पुढे टाकली
बैराग वेषाने मागे तिला जोगवा
डोळ्यांमधी आगळा भाव त्याच्या पेटला
जानकीचा धीर सारा हाती पायी गोठला
राक्षसाच्या हाती देह तिचा ओणवा
रामासंगे जानकी नांदताना काननी
सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी
सीता म्हणे लाडकी, "मारा त्यासी राघवा
कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा"
राम गेले धावुनी ग बाणभाता घेउनी
सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी
साद आला दूरचा कोणी मला वाचवा
ओळखिला साद तो बावरली सुंदरा
रामा मागे धाडिले लक्ष्मणा देवरा
काय झाले काय की ग? चित्ती उठे कालवा
आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली
रावणाने पाऊले तोच पुढे टाकली
बैराग वेषाने मागे तिला जोगवा
डोळ्यांमधी आगळा भाव त्याच्या पेटला
जानकीचा धीर सारा हाती पायी गोठला
राक्षसाच्या हाती देह तिचा ओणवा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | मधुबाला जव्हेरी |
चित्रपट | - | सांगत्ये ऐका |
राग | - | सारंग |
गीत प्रकार | - | राम निरंजन, चित्रगीत |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
ओणवा | - | पुढे वाकलेला. |
कंचुकी | - | चोळी. |
कानन | - | अरण्य, जंगल. |
भाता | - | बाण ठेवण्याची पिशवी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.