देवरूप होऊ सगळे
देवरूप होऊ सगळे, आम्ही एकियाच्या बळे
सप्तसागराला शक्ती, बिंदु बिंदु मिळता पाणी
एकजीवी अणुरेणूची युगे युगे फिरते धरणी
प्रेमभाव स्वप्नी वचनी, पाचामुखी ईश्वर बोले
भूकबळी पक्षी धरता पारध्याने टाकुन जाळे
पंख गुंतवूनि पंखी एकरूप पक्षी झाले
गळ्यामधे घालुनी गळे मृत्युलाच मारून गेले
वाढवीत भेदभावा दुष्टतेचा फिरतो कावा
गाठुनिया भोळ्या जीवा अंधारात घालित घावा
चित्त नित्य सावध ठेवा एकलक्षी लावून डोळे

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
राग | - | मालकंस |
गीत प्रकार | - | भावगीत |
कावा | - | कारस्थान / लबाडी, ढोंग. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.