देवाजीचं नाव घ्यावं
रामाच्या ग पारामंदी घास भरिते मोत्यांचा
सूर घुमतो जात्यांचा घरोघरी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी
कोटरात आली जाग पिलापाखराला
हंबरून बोलाविते गाय वासराला
सड्यासंगं रांगोळीचं नक्षीकाम दारी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
फुलला भक्तीचा पारिजात
अंगणी फुलांची बरसात
आनंद खेळतो गोकुळात
सुख माईना माझ्या दारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
सूर घुमतो जात्यांचा घरोघरी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी
कोटरात आली जाग पिलापाखराला
हंबरून बोलाविते गाय वासराला
सड्यासंगं रांगोळीचं नक्षीकाम दारी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
फुलला भक्तीचा पारिजात
अंगणी फुलांची बरसात
आनंद खेळतो गोकुळात
सुख माईना माझ्या दारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | बकुळ पंडित, सुधीर फडके |
चित्रपट | - | कुंकू माझं भाग्याचं |
गीत प्रकार | - | चित्रगीत, प्रार्थना |
कोटर | - | झाडातली ढोली. |
वासुदेव | - | श्रीकृष्ण / मोरांच्या पिसांची उंच टोपी घालून भिक्षा मागणारी एक जात. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.