A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देवा तुझ्या गाभार्‍याला

देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच न्हाई
सांग कुठं ठेवू माथा? कळंनाच काही

देवा कुठं शोधू तुला? मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा !

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग लागुदे तुझ्या उरी

आरपार काळजात का दिलास घाव तू?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

का? कधी? कुठे? स्वप्‍न विरले, प्रेम हरले
स्वप्‍न माझे आज नव्याने खुलले
अर्थ सारे स्पर्शाने उलगडले

आरपार काळजात का दिलास घाव तू?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग लागुदे तुझ्या उरी

का रे? तडफड ही ह्या काळजामधी
घुसमट तुझी रे होते का कधी?
मानसाचा तू जल्म घे
डाव जो मांडला, मोडू दे

का हात सुटले? श्वास मिटले, ठेच लागे
उत्तरांना प्रश्‍न कसे हे पडले
अंतरांचे अंतर कसे ना कळले

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग लागुदे तुझ्या उरी

आरपार काळजात का दिलास घाव तू?
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू