देवा हो सख्या पांडुरंगा
देवा हो सख्या पांडुरंगा
दर्शन दे मजला श्रीरंगा
भक्त तुझा तो नामा थोर
त्यांस दाविलें रूप मनोहर
तुम्हीच दिधला पुंडलिका वर
तुकयासाठीं धाउनी गेला,
तारिलेंसी अभंगा
उद्धरीलें तूं ध्रुवबाळाला
तारियले तूं प्रह्लादाला
अशी तुझी ही अगाध लीला,
चालविलेंसी अपंगा
दर्शन दे मजला श्रीरंगा
भक्त तुझा तो नामा थोर
त्यांस दाविलें रूप मनोहर
तुम्हीच दिधला पुंडलिका वर
तुकयासाठीं धाउनी गेला,
तारिलेंसी अभंगा
उद्धरीलें तूं ध्रुवबाळाला
तारियले तूं प्रह्लादाला
अशी तुझी ही अगाध लीला,
चालविलेंसी अपंगा
गीत | - | |
संगीत | - | |
स्वर | - | विठ्ठल शिंदे |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
ध्रुव | - | उत्तानपादराजाचा मुलगा. याचा लहानपणी अपमान व निर्भत्सना केला गेल्याने रागावून याने वनात मोठे तप केले व ध्रुव (अढळ)पद मिळविले. |
प्रह्लाद | - | हिरण्यकशिपू पुत्र. याच्या रक्षणार्थ विष्णूने नारसिंहावतार घेऊन हिरण्यकशिपूस मारिले. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.