A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देव दयानिधि

देव दयानिधि भक्तांचा कैवारी ।
नाममात्रें तारी सर्वांलागीं ॥१॥

तया देवराया गावें ही आवडी ।
लागे मनीं गोडी सर्वकाळ ॥२॥

नाहीं यातिकूळ उच्च-नीच भेद ।
भाव एक शुद्ध पाहतसे ॥३॥

नामा म्हणे काय सांगावें नवल ।
अखंड दंडलें व्योमाकार ॥४॥