A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दीन पतित अन्यायी

दीन पतित अन्यायी । शरण आलें विठाबाई ॥१॥

मी तों आहें यातिहीन । नकळे कांहीं आचरण ॥२॥

मज अधिकार नाहीं । भेट देई विठाबाई ॥३॥

ठांव देई चरणापाशीं । तुझी कान्होपात्रा दासी ॥४॥