दारीच्या देवळींत जळो
दारीच्या देवळींत जळो पणति सारी रात
प्रगटले न अजून कांत, अंधकार अंतरात
रात्रंदिन वाट बघत, घालुनी पळी कडींत
येइना अजून मूर्त माघारी मंदिरांत
रांगोळी अंगणात अश्रुबिंदु घालतात
गाल-ओठ भिजुन जात ओघळत्या काजळांत
वृंदावनि सांजवात नि:श्वासे विझुन जात
तुळशीच्या प्रदक्षिणांत चर्र होत काळजांत
नाथांची झाली साथ फक्त सात पावलांत
आज ऊर-तारु फुटत विरहाच्या वादळांत
कुंकवाच्या कोयरीत, रोज थबकतोहि हात
वैरी जे जे न चिंती ते ते ये मनात
प्रगटले न अजून कांत, अंधकार अंतरात
रात्रंदिन वाट बघत, घालुनी पळी कडींत
येइना अजून मूर्त माघारी मंदिरांत
रांगोळी अंगणात अश्रुबिंदु घालतात
गाल-ओठ भिजुन जात ओघळत्या काजळांत
वृंदावनि सांजवात नि:श्वासे विझुन जात
तुळशीच्या प्रदक्षिणांत चर्र होत काळजांत
नाथांची झाली साथ फक्त सात पावलांत
आज ऊर-तारु फुटत विरहाच्या वादळांत
कुंकवाच्या कोयरीत, रोज थबकतोहि हात
वैरी जे जे न चिंती ते ते ये मनात
गीत | - | बाबुराव गोखले |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | भावगीत |
कांत | - | पती. |
तारु | - | नौका. |
देवळी | - | भिंतीतला कोनाडा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.