दळितां कांडितां
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबे क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार । मुखीं हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥
न विसंबे क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार । मुखीं हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥
गीत | - | संत जनाबाई |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | संत जनाबाई |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, चित्रगीत, संतवाणी |
चक्रपाणि(णी) | - | हातात सुदर्शनचक्र असलेला- विष्णू / विष्णूचा आठवा अवतार- कृष्ण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.