A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
छुन छुन बोलतीया

छुन छुन बोलतीया हातामधी घांट
प्रीत माझी चालतीया जेजुरीची वाट

मार्गसर आला बाई बाळपण गेलं
अंगामधी अंग असं चोरटं आलं
डोईमधी मरवा, साज संग हिरवा
मोतियाचा गजरा, भरजरी थाट

काल माझा झाला राया साखरपुडा
देवाच्या नावानं रं भरलाय्‌ चुडा
लाजरी बुजरी पोर झाली नवरी
पापणीनं धरलाय अंतरपाट

नजरेच्या पांखरा मारु नको खडं
काळजाच्या धडधड येऊ नको पुढं
लागाबांधा तोड रं, नाद माझा सोड
मल्हारीची नार मी, हट, सोड माझी वाट