चुकली ग गोफणफेक
चुकली ग गोफणफेक, लाजरा नेम आज हुकला
रानराघुचा कळप बाई ग पिकावरी झुकला
पारवा पिकावरी झुकला
ही लवली काया घेतां गोफणगिरकी
मिसळली तयातच उरांतली थरथर कीं
अन् नेम लागला तेढा, आला गळ्यांत गोफणवेढा
हांसला पाहुनि गहूं, हरबरा पिकला
पारवा पिकावरी झुकला
पाहुनी नवतिचा मळा, काळीची कोवळी कळा
ये राजरोस वावरीं पाहुणा पायवाट चुकला
पारवा पिकावरी झुकला
रानराघुचा कळप बाई ग पिकावरी झुकला
पारवा पिकावरी झुकला
ही लवली काया घेतां गोफणगिरकी
मिसळली तयातच उरांतली थरथर कीं
अन् नेम लागला तेढा, आला गळ्यांत गोफणवेढा
हांसला पाहुनि गहूं, हरबरा पिकला
पारवा पिकावरी झुकला
पाहुनी नवतिचा मळा, काळीची कोवळी कळा
ये राजरोस वावरीं पाहुणा पायवाट चुकला
पारवा पिकावरी झुकला
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | डी. पी. कोरगावकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | गळ्याची शपथ |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
गोफण | - | शेतातील धान्यावरील पक्षी उडवण्यासाठी दगड मारताना वापरावयाचे उपकरण. |
नवती | - | तरुणी / तारुण्य / नवी पालवी. |
पारवा | - | कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.