चार होत्या पक्षिणी त्या
चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी
दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती
बाण आला एक कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा
कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले
ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले
चार कंठी बांधलेली एक होती साखळी
दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती
बाण आला एक कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा
कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले
ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | पं. वसंतराव देशपांडे |
स्वर | - | फैयाज |
नाटक | - | वीज म्हणाली धरतीला |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
हे नाटक लिहिताना, द. व. पारसनीसलिखित 'महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र' आणि सुप्रसिद्ध हिंदी लेखक. वृंदावनलाल शर्मा यांनी लिहिलेली 'झांशीची राणी लक्ष्मीबाई' ही संशोधनपर चरित्रकथा, या पुस्तकांचा चरित्रात्मक माहितीसाठी मी प्रामुख्याने उपयोग केला आहे. शर्मांच्या मूळ हिंदी पुस्तकाचा सौ. शेवडे यांनी सुरस अनुवाद केला आहे. या सर्व ग्रंथकारांचा मी ऋणी आहे.
आणि कित्येक वर्षे मला झपाटून टाकणार्या या 'राणी'ला रंगभूमीवर आणणार्या श्री. प्रभाकर पणशीकर, सौ. सुधा करमरकर, श्री. पुरुषोत्तम दारहेकर, श्री. वसंत देशपांडे या कलावंत मित्रांचाही.
(संपादित)
वि वा शिरवाडकर
'वीज म्हणाली धरतीला' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.