चंद्रमुखी तू मेघसावळी
चंद्रमुखी तू मेघसावळी
सावली आभाळाची
हिरव्या रानी जशी दरवळे
पाकळी हिरव्या चाफ्याची ग
नेत्र तुझे रानात पाहुनी
हरिणे बघ पडतात फशी
कवळी काया अशी थरारे
पहिली पाऊसधार जशी ग
शब्दांच्या तळी सूर मधाचा
साळुंकीची जात जशी
ओठावरचा तीळ लाजरा
मदनावरची मात जशी ग
भाग्यवंत तो पुरुष ज्याला
तू आपणहुन आलिंगीशी
नागिणीच्या विळख्यात तुझ्या या
सुख सोन्याचे बावनकशी ग
सावली आभाळाची
हिरव्या रानी जशी दरवळे
पाकळी हिरव्या चाफ्याची ग
नेत्र तुझे रानात पाहुनी
हरिणे बघ पडतात फशी
कवळी काया अशी थरारे
पहिली पाऊसधार जशी ग
शब्दांच्या तळी सूर मधाचा
साळुंकीची जात जशी
ओठावरचा तीळ लाजरा
मदनावरची मात जशी ग
भाग्यवंत तो पुरुष ज्याला
तू आपणहुन आलिंगीशी
नागिणीच्या विळख्यात तुझ्या या
सुख सोन्याचे बावनकशी ग
गीत | - | शरद घाग |
संगीत | - | नंदु प्यारे |
स्वर | - | सुरेश वाडकर |
चित्रपट | - | गंध मातीला आला |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.